Ad will apear here
Next
‘अपयशाने खचून न जाता नव्याने यश मिळवू या’


अंबरनाथ : ‘ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत महत्त्वाचा जिल्हा असून, या जिल्ह्यात सर्वाधिक ताकद निर्माण करायची आहे. कितीही अपयश आले, पडझड झाली, तरी त्याने खचून न जाता आपल्याला चांगल्या पद्धतीने यश मिळवायचे आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.

पालघर, वसई-विरार, भाईंदर येथे यशस्वी मेळावे घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांची पहिला कार्यकर्ता मेळावा ठाणे ग्रामीणमधील अंबरनाथमध्ये नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार पाटील यांनी पक्षाचा आढावा घेताना पदाधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापनही केले. शिवाय यापुढे बुथ कमिट्या कशापद्धतीने सक्षम करावयाच्या आहेत हे सांगतानाच कामाचा मूलमंत्रही कार्यकर्त्यांना पाटील यांनी दिला.

‘भविष्यकाळ हा राष्ट्रवादीसाठी आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील १२ आमदार पुन्हा निवडून आणण्यासाठी सर्वांनी काम करा,’ असा सल्ला माजी मंत्री गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांना दिला.

या मेळाव्यात इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावेळी प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्वागत केले.

या कार्यकर्ता मेळाव्याला प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, शहापूर आमदार पांडुरंग वरोरा, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, युवक प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, माजी आमदार गोटीराम पवार, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, शहराध्यक्ष सदाशिव पाटील, कॅप्टन आशिष दामले, गुलाबराब करडुलेपाटील आदींसह जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, युवतीप्रमुख, युवक उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZUBBT
Similar Posts
नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष नियुक्त्या जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सन २०१८-२० पर्यंतची पक्षातंर्गत निवडणूक पार पडली असून, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभेची पहिली यादी जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची १२ जणांची पहिली यादी आज (१४ मार्च) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
आमदार जयंत पाटील १७ नोव्हेंबरला अकोला दौऱ्यावर मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील १७ नोव्हेंबर २०१८ रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर असून, या दौऱ्यामध्ये अकोला जिल्हा, ग्रामीण आणि तालुका कार्यकारिणीच्या आढावा बैठका व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिटीचा मेळावा घेणार आहेत,’ अशी माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली
‘उमेदवार चाचपणीनंतरच योग्य निर्णय घेण्यात येईल’ मुंबई : ‘लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी आघाडी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिथे शक्ती आहे तिथे काम करण्यासाठी, जागा लढवण्यासाठीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि तिथल्या उमेदवारांच्याबाबतीत चाचपणी करण्यात आली आणि त्यावर भविष्यकाळात योग्य तो निर्णय घेतला जाईल,’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language